Maharashtra Budget राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंधराशे रुपये वाढ, राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Budget
Maharashtra Budget
Maharashtra Budget

Maharashtra Budget महाराष्ट्राचा 2023 चा अर्थसंकल्प आज सभागृहात मांडला जात आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. यासोबतच शिक्षकांच्या पगारातही वाढ करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

Maharashtra Budget

शिक्षकांचे पगार किती वाढले?
पगारवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षक आणि नोकरदारांना राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी शिक्षकांसाठी सरासरी 10,000 रुपयांची भरघोस पगारवाढ जाहीर केली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांचे मानधन 6,000 रुपयांवरून 16,000 रुपये करण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन 8,000 वरून 18,000 रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन 9,000 वरून 20,000 रुपये करण्यात येणार आहे.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या वेतनात भरघोस वाढ

आशा स्वयंसेविकांचे मानधन रु.3500 ते रु.5000
गट प्रवर्तकांचे मानधन रु.4700 ते रु.6200
अंगणवाडी सेविकांचे मानधन रु.8325 ते रु.10,000
मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन रु.5975 ते रु.7200
अंगणवाडी मदतनीसांचे मानधन रु.4425 ते रु.5500
अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत.
अंगणवाड्यांद्वारे घरपोच अन्न वितरणासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

Related posts

One Thought to “Maharashtra Budget राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंधराशे रुपये वाढ, राज्य सरकारचा निर्णय”

Leave a Comment