
Namo Shetkari Yojana महाराष्ट्रात आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान सन्मान निधी) ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. Namo Shetkari Yojana
मोदी सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील शिंदे सरकारही शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. याअंतर्गत राज्यातील दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
हे वाचले का – राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत; फडणवीसांची मोठी घोषणा
Namo Shetkari Yojana
या योजनेवर राज्य सरकार दरवर्षी ६,९०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विशेष म्हणजे, केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये आधीच देत आहे. ही रक्कम दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे १३ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पीएम किसान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12 हजार मिळणार आहेत
महाराष्ट्राच्या एकनाथ शिदें सरकारने अर्थसंकल्पात शेतकर्यांना वार्षिक 6,000 हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने, राज्यातील शेतकर्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये मानधन मिळणार आहे. केंद्र सरकार 6 हजार रुपये देत आहे आणि आता महाराष्ट्र सरकारही तेवढीच रक्कम देणार आहे. अर्थसंकल्पात राज्य परिवहन बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलतीसह मुद्रांक शुल्कात १ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.